मुंबई : बॉलिवूड अभिनेत्री सोनाक्षी सिन्हा आणि अभिनेता झहीर इकबाल यांचे मागच्या महिन्यात 23 जूनला लग्न झाले होते. लग्न झाल्यापासून दोघंही चर्चेचा विषय आहेत. यादरम्यान आता सोनाक्षी सिन्हा प्रेग्नंट असल्याच्या चर्चां सुरु झाल्या आहेत. याला कारणदेखील नुकताच एक समोर आलेला व्हिडिओ…
काय आहे व्हिडिओमध्ये?
सोनाक्षी आणि झहीर एकत्र रेस्टॉरंटच्या बाहेर स्पॉट झाले. बाहेर येताना सोनाक्षी पायऱ्या उतरत होती तेव्हा जहीरने तिला पकडलं होतं. झहीर सोनाक्षीला सांभाळताना दिसला. मग काय हा व्हिडीओ व्हायरल होताच व्हिडीओवर कमेंटचा पाऊस दिसला. सर्वच सोनाक्षीला प्रेग्नंट असल्याचा प्रश्न विचारत आहे. filmygyan नावाच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर करण्यात आला आहे.
कमेंट्सचा भडीमार
सोनाक्षी झहीरचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर नेटकरी कमेंट करत विचारच आहे की, खरंच प्रेग्नंट आहे का?, तर काहींनी म्हटलं लग्नाच्या एका महिन्यात प्रेग्नंट तर कोणी म्हटलं लग्नाच्या आधीच प्रेग्नंट होती का? अशा अनेक वेगवेगळ्या कमेंट सोनाक्षी झहीरच्या व्हिडीओवर येताना दिसत आहे.