पॅरिस – फ्रान्समध्ये राष्ट्रपती इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, देशात लॉकडाऊनची प्रक्रिया 2 एप्रिलपासून राबवली जाणार असून ही पुढील चार आठवड्यापर्यंत कायम असणार आहे. यामध्ये अत्यावश्यक सेवा वगळता बाकी सर्व बंद राहणार आहे. लोकांना कार्यालयात न येता घरुनच ‘वर्क फ्रॉम होम’ करावे लागेल. तसेच सार्वजनिक सभांसोबच विनाकारण आपल्या घरांपासून 10 किलोमीटर दूर प्रवास करणार्या लोकांवरदेखील बंधन असणार आहे.
कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेमुळे फ्रान्समध्ये सक्रीय रुग्णांचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच आहे. याच पार्श्वभूमीवर इमॅन्युएल मॅक्रॉन यांनी सांगितले की, देशात पुढील तीन आठवड्यांसाठी शाळा बंद असणार आहे. तर दुसरीकडे देशातील प्रवासावरदेखील पुढील एक महिन्यासाठी बंदी घातली आहे. या कोरोना महामारीच्या तिसर्या लाटेतून वाचण्यासाठी लॉकडाऊन करावेच लागणार आहे. नाहीतर यामुळे रुग्णांच्या संख्येत वाढ होऊन याचे परिणाम हॉस्पिटलवर जाणवतील. जर आम्ही यावर वेळीच उपाय केले नाहीतर आपण कोरानावरील नियंत्रण गमावून बसू.
ब्राझील देशात कोरोना महामारीमुळे तेथील परिस्थिती दिवसेंदिवस खराब होत आहे. गेल्या चोवीस तासात या देशात 89,200 पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले. दरम्यान यात 3950 लोकांचा मृत्यू झाला असून हा आतापर्यंतचा सर्वात मोठा आकडा आहे. यापूर्वी 30 मार्च रोजी 3668 लोकांचा मृत्यू झाला होता. येथे आतापर्यंत 1.27 कोटी लोक कोरोनाच्या विळ्याख्यात आले असून यामध्ये 3.21 लाख लोकांचा मृत्यू झाला आहे.