लस घेतल्यास एक लिटर पेट्रोल मोफत; ‘या’ जिल्हयात भन्नाट ‘ऑफर’

लस घेणाऱ्यास मिळणार एक लिटर पेट्रोल मोफत! लसीकरणसाठी सरकारनं नागरिकांना दिली 'स्पेशल ऑफर'

नवी दिल्ली – सध्या देशासह संपूर्ण जगात करोनाचा प्रभाव झपाट्याने वाढत आहे.  दररोजच्या  करोना रुग्णांमुळे संपूर्ण जगातील देशांवर  ताण आला आहे. करोनाच्या विळख्यातून बाहेर निघण्यासाठी सर्व देशांकडून लस आणि लसीकरणावर भर दिला जात आहे. मात्र लसीबाबत आताही लोकांमध्ये संभ्रम असून लस घेण्यास लोकांना कडून पाठ दाखवली जात आहे.

लसीकरणाबाबत  नागरिकांच्या मनामध्ये गैरसमज निर्माण झाले आहेत. अश्यातच आता नागरिकांनी लवकरात लवकर करोना लस घ्यावी यासाठी सर्व देशातील सरकारकडून भन्नाट आयडिया लढविली जात आहे. काही ठिकाणी लस घेतल्यास बिअर मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आले आहे तर काही ठिकाणी सरकारकडून ऑफर, बक्षीस आणि कठोर नियम करुन  नागरिकांना लस घेण्यास भाग पाडावं लागत आहे.

अशीच काहीशी परिस्थिती  झारखंड राज्यात घडली आहे. करोना प्रतिबंधात्मक लस घेणाऱ्यास या मोफत पेट्रोलचा लाभ दिला गेला आहे. सिंघभूम जिल्हयातील चक्रधरपूर लसीकरणाला पाठिंबा देण्यासाठी करोना लस घेणाऱ्यास एक लिटर पेट्रोल मोफत देण्यात आलं आहे.  या परिसरातीळ  नागरिकांमध्ये लसीबाबतचा संभ्रम असून लस घेण्यास लोकांना कडून पाठ दाखवली जात आहे. त्यामुळे असं अजब आयडिया लढविली जात आहे. 

याबाबत स्थानिक प्रशासन अधिकाऱ्यांनी सांगितले की,’लस घेण्यास लोकांनी प्रेरीत व्हावे म्हणूनच  स्थानिक प्रशासनाने इंडियन ऑईल कॉर्पोरेशनसोबत मिळून एक विशेष लसीकरण मोहीम राबवली.’

ते पुढे म्हणाले,’ आतापर्यंत  एकूण २४० जणांनी त्यांनी लस घेतल्यानंतर एक लिटर पेट्रोलचे मोफत कुपन दिले गेले.’ 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.