PM Narendra Modi | पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाराणसीमध्ये मोठी घोषणा केली आहे. आम्ही एक लाख तरुणांना राजकारणात आणणार आहोत. ज्या तरुणांचा कोणत्याही राजकीय कुटुंबांशी संबंध नसेल असे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे.
मोदी यांनी वाराणसीमध्ये घराणेशाहीची मानसिकता नष्ट करण्याच्या अभियानाची सुरुवात केली त्यावेळी ते बोलत होते.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सलग तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. तिसऱ्यांदा पंतप्रधान झाल्यानंतरचा मोदी यांचा हा दुसरा वाराणसी दौरा आहे. आपल्या या दौऱ्यामध्ये त्यांनी आर जे शंकरा आय हॉस्पिटलचे उद्घाटन केले तसेच शंकराचार्य स्वामी शंकर विजयेंद्र सरस्वती यांची भेट घेऊन त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. PM Narendra Modi |
पुढे बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटले की, आम्ही म्हणालो होतो की अयोध्यामध्ये भव्य असे रामाचे मंदिर उभे राहिल. आज अयोध्येमध्ये भव्य असे रामाचे मंदिर निर्माण केले. आज लाखो लोक रामलल्लाचे दर्शन घेत आहेत.तीन तलाक कायदा देखील आमच्याच सरकारने आणला. या कायद्यामुळे महिलांचं संरक्षण झाले. PM Narendra Modi |
एनडीए सरकारने कधीही गरिबांच्या हक्कावर गदा आणली नाही, उलट गरिबांना दहा टक्के आरक्षण दिले. ते गरीब आज आम्हाला आर्शीवाद देत आहेत. हरियाणा विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपला मोठे यश मिळाले, तिथे सलग तिसऱ्यांदा एनडीएची सत्ता आली. जम्मू काश्मीरमध्ये देखील आम्हाला रेकॉर्ड ब्रेक मतदान झाले, असेही यावेळी मोदींनी म्हटले आहे.
घराणेशाहीवर हल्लाबोल
यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घराणेशाहीवर जोरदार हल्लाबोल केला. घराणेशाहीमुळे सर्वाधिक नुकसान हे तरुणांचे होत असल्याचे नरेंद्र मोदी यांनी म्हटले आहे. यामुळेच आम्ही असा निश्चित केला आहे की, एक लाख तरुणांना आम्ही राजकारणात आणणार आहोत.ज्यांचा कोणत्याही राजकीय कुटुंबांशी संबंध नसेल, असे मोदी यांनी म्हटले आहे.