नगर – अकोले येथील भरत काठे यांचे आयडीबीआय बॅंक खात्यातून कट झालेले एक लाख रुपये सायबर पोलिसांनी त्यांना परत मिळून दिले आहेत.
भरत काठे यांचे आयडीबीआय बॅंकेमध्ये खाते आहे. त्या खात्यातून 2 सप्टेंबर रोजी काठे यांचे तब्बल एक लाख रुपये कमी झाले. त्यांनी तात्काळ नगर येथील सायबर पोलीस ठाण्याशी संपर्क साधून तक्रार दाखल केली.
त्यानुसार सायबर सेलचे पोलीस निरीक्षक अरुण परदेशी, प्रतीक कोळी, उमेश खेडकर, विशाल अमृते, स्मिता भागवत, दीपाली घोडके, नेहा तावरे यांनी बॅंकेशी पत्रव्यवहार करुन तक्रारदार यांचे पैसे ज्या बॅंक खात्यात ट्रान्स्फर झाले होते ते बॅंक खाते गोठवले. काठे यांचे बॅंक खातेत जमा करुन ती त्यांना परत मिळवून दिली आहे.