आठ महिन्यात पहिल्यांदाच एक लाख कोटी जीएसटी जमा

करोनानंतरच्या काळात अर्थव्यवस्था सुधारण्याचे संकेत

नवी दिल्ली – फेब्रुवारी 2020 नंतर करोनाव्हायरसच्या प्रसाराने झालेली कोव्हिड19 ची महामारी सर्वच व्यवसायाच्या मुळाशी आली. लॉकडाऊनमुळे गेल्या आठ महिन्यांत त्यामुळेच गुडस ऍण्ड सर्व्हिस टॅक्‍स अर्थात जीएसटीचा महसूलही कमालीचा घटला होता. मात्र, पावसाळ्यानंतर टप्प्याटप्प्याने लागू झालेल्या “अनलॉक’ प्रक्रियेमुळे काही निवडक व्यवसाय वगळता सर्वत्र व्यापार आणि उद्योग सुरु झाले आहेत. त्याचा सकारात्मक परिणाम अर्थ व्यवस्थेवर होत असून, ऑक्‍टोबर महिन्यात एक लाख कोटीपेक्षा जास्त जीएसटी जमा झाल्याचे केंद्रिय अर्थमंत्रालयाने जाहीर केले आहे.

ही व्यवसायवाढ देशाच्या आर्थिक हिताची असल्याचेही अर्थ मंत्रालयाने म्हटले आहे. याचाच अर्थ वर्ष 2020-2021 या आर्थिक वर्षातला सर्वाधिक जीएसटी नुकत्याच संपलेल्या ऑक्‍टोबर महिन्यात गोळा झाला आहे.

अर्थमंत्रालयाने प्रसिद्ध केलेल्या परिपत्रकात म्हटले आहे की, ऑक्‍टोबर 2020 मध्ये 1,05,155 कोटी रुपयांचा महसूल जीएसटीच्या स्वरुपात गोळा झाला असून त्यापैकी 19.193 कोटी सी-जीसटी (केंद्रिय), 5,411 कोटी एस-जीएसटी (राज्य) आणि 52,540 कोटी आय-जीसटी (इंटिग्रेटेड) असे या रकमेचे विभाजन आहे.

इंटिग्रेटेड जीएसटीमध्ये 23,375 कोटी आयात शुल्कावरील कर, तर 8,011 कोटी सेस आणि अन्य 930 कोटी असे विभाजन आहे.
गतवर्षी म्हणजे ऑक्‍टोबर 2019 मध्ये जमा झालेल्या जीएसटीच्या तुलनेत यावर्षीच्या ऑक्‍टोबर महिन्यातील जीएसटीची रक्कम तब्बल 10 टक्‍क्‍याने जास्त आहे. गेल्यावर्षी ही रक्कम 95,379 कोटी रुपये होती. त्यात आता वाढ झाली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.