राजगुरुनगर : पानमळा येथे दुचाकी व ट्रक यांच्या धडकेत 35 वर्षीय युवकाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना आज सकाळी दहाच्या सुमारास घडली.अशोक भानुदास सुपेकर रा. लोणी खुर्द जिल्हा अहमदनगर असे अपघातात मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आहे.
याबाबतची माहिती अशी की, पुणे नाशिक महामार्गावरून अशोक भानुदास सुपेकर हे मंचरच्या दिशेने दुचाकीवरून(एमएच 14 बीआर 2763)जात असताना समोरून पुण्याच्या दिशेने जात असलेला टाटा आयशर ट्रक क्र(एमएच 12 क्यूडब्ल्यू 9414)यांच्यात समोरासमोर धडक झाली.
त्यात अशोक सुपेकर यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. ट्रक चालक अपघात झाल्यानंतर फरार झाला आहे.खेड पोलिसांनी आयशर ट्रक चालकावर गुन्हा दाखल केला आहे. अधिक तपास पोलीस हवालदार बाळकृष्ण साबळे करीत आहेत.
दरम्यान राजगुरूनगर ते खेड घाट मृत्यूचा साफळा बनला आहे. अरुंद रस्ता आणि वाहतूक कोंडी त्यातच रस्त्याचे काम सुरू असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे. पुणे नाशिक राष्ट्रीय महामार्गावर जड अवजड वाहनांची वाढती संख्या लक्षात घेता खेड घाट वाहतुक कोंडीची डोकेदुखी बनला आहे. अलकीडच्या काळात कजेड घाटात अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढतच असल्याने बाह्यवळण रस्ता जलदगतीने होणे अपेक्षित आहे.