मांडवगण फराटा : गणेगाव दुमाला (ता. शिरूर) येथे एकास बलात्काराच्या खटल्यातून वाचवतो म्हणून पैसे न दिल्याने तिघांनी मारहाण केली आहे. याप्रकरणी मनोज प्रभाकर निंबाळकर (वय. 24, रा. गणेगाव दुमाला, ता. शिरूर) यांनी फिर्याद दिली आहे.
आरोपी रवींद्र चालशा भोसले, कोल्ह्या चालशा भोसले (दोघे रा. गणेगाव दुमाला), संभाजी पवार, (रा. तांदळी ता. शिरूर) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
मनोज निंबाळकर हा तांदळी म्हसोबाफाटा चौकातून मोटरसायकलवरून घराकडे जात होता. तिघेही आरोपी पाठीमागून मोटारसायकलवर आले. त्यांनी निंबाळकर यांच्या मोटारसायकलला त्यांची मोटारसायकल आडवी लावली. बलात्काराच्या खटल्यातून वाचवतो, म्हणून दोन लाख रुपयांची मागणी आरोपींनी केली. त्यावेळी निंबाळकर याने माझ्याकडे 2 लाख रुपये नाहीत, असे सांगितले. त्यानंतर निंबाळकर याला हल्लेखोरांनी लोखंडी रॉडने मारहाण केली.