मुंबईहून आलेल्या एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची लागण
शिक्रापूर (प्रतिनिधी) : शिक्रापूर ता. शिरूर येथे मुंबई घाटकोपर येथून आलेल्या एकाच कुटुंबातील दोघांना कोरोनाची लागण झाल्याची घटना घडली असताना आरोग्य विभागाच्या वतीने सदर कुटुंबातील इतर पाच जणांना तपासणीसाठी पाठविण्यात आले असताना त्यातील एका युवकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे आता काही सहानुभूती मिळालेल्या शिक्रापूर परिसरात पुन्हा खळबळ उडाली आहे.
शिक्रापूर ता. शिरूर येथील कामानिमित्ताने घाटकोपर मुंबई येथे राहणारे सात जणांचे कुटंब शिक्रापूर राऊतवाडी येथे आले होते, २४ मे रोजी या कुटुंबातील दोघांना काही त्रास होऊ लागल्याने त्यांनी पुणे येथील वेगवेगळ्या रुग्णालयात धाव घेतली होती, त्यावेळी सदर कुटुंबातील दोघा बापलेकांची कोरोना तपासणी केली असता दोघांचे कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आले होते.
दरम्यान, आरोग्य विभागाच्या वतीने सदर दोन व्यक्तींच्या संपर्कात आलेल्या इतर व्यक्तींची माहिती घेत कुटुंबातील अन्य पाच जणांचे स्व्याब तपासणीसाठी पाठविले होते, त्या पाच जणांचे अहवाल आरोग्य विभागाकडे प्राप्त झाले असून त्या पाच जणांपैकी एकाचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आला असल्यामुळे आता शिक्रापूर येथील एकाच कुटुंबातील तिघांना कोरोनाची बाधा झाली असल्यामुळे खळबळ उडाली आहे.