जळोची(प्रतिनिधी) – ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी कोरोनाग्रस्त रुग्णांना उपयुक्त असणाऱ्या रेमीडेसेव्हर ही शंभर इंजेक्शन आज बारामतीकरांसाठी दिली. येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजयकुमार तांबे यांना येथील गोविंद बागेत बोलवून शहरात कोरोना संदर्भातील माहिती घेतली.
यावेळी तांबे यांनी पवार यांना सर्व माहिती दिली. यावेळी पवार यांनी रेमीडेसेव्हर ही शंभर इंजेक्शन तांबे यांच्याकडे दिली व गरजू कोरोना बाधितांना देण्याची सूचना केली. यावेळी नगराध्यक्षा पौर्णिमा तावरे, गटनेतेे सचिन सातव, राष्ट्रवादीचेे तालुकाध्यक्ष संभाजी होळकर उपस्थित होते.