पुणे : प्रतिनिधी
कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव कमी व्हावा तसेच रस्त्यावरील नागरिकांची गर्दी टाळण्यासाठी शहरातील हॉटेल्स, दुकाने बंद ठेवण्याचे आदेश प्रशासनाकडून देण्यात आले आहेत. त्या आदेशाचा भंग करून शहरातील विविध भागात दुकाने तसेच हॉटेल्स सुरू ठेवल्याप्रकरणी पोलिसांकडून गत दोन दिवसात दीडशे पेक्षा जास्त हॉटेल्स तसेच दुकानांवर कारवाई करून आयपीसी १८८ अंतर्गत गुन्हे दाखल केले आहेत.