माणुसकीची मशाल पेटवू; पूरग्रस्तांना मदत करू

दि. 11, 12 ऑगस्ट रोजी साहित्य, वस्तू संकलन शिबिर


दै. “प्रभात’ आणि श्री तिरूपती नागरी सह. पतसंस्थेचे आवाहन

पुणे – “दै. प्रभात’ आणि श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्था यांच्यातर्फे सांगली पूरग्रस्तांना मदत म्हणून साहित्य, वस्तू संकलन शिबिर आयोजित करण्यात आले आहे.

सांगली, कोल्हापूर आणि कोकणातील काही गावांमध्ये भयानक पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. या गावांमध्ये पाणी शिरल्याने येथील जनजीवन पूर्णत: कोलमडले आहे. नागरिकांना घरे रिकामी करावी लागल्याने आणि त्यांची घरे वाहून गेल्याने बेघर व्हावे लागले आहे. अद्यापही पाणी ओसरले नसल्याने नागरिकांना मदत पोहोचवणेही अवघड झाले आहे. त्यांना जीवनावश्‍यक गोष्टींची गरज असून, शहरातील नागरिकांना ते साहित्य पोहोचवणे आवश्‍यक आहे. त्यासाठीच ही मदत गोळा करण्याचा उपक्रम शिबिराच्या माध्यमातून “दै. प्रभात’ आणि श्री तिरूपती नागरी सहकारी पतसंस्थेमार्फत आयोजित केला आहे.

काय देता येईल…
या शिबिरामध्ये गहू, तांदूळ, चहा पावडर, डाळी, साखर, तेल, बॅटरी, मेणबत्त्या, माचिस बॉक्‍स, टुथब्रश, पेस्ट, फुड प्लेटस, साबण, ब्लॅंकेट, शाल, बेडशीट, मच्छरदाणी, मच्छर कॉईल, फुड पॅकेट्‌स, बिस्किट पुडे, ओआरएस पॅकेट्‌स, इस्टण्ट फुड पॅकेट, लहान मुलांचे कपडे, वापरण्याजोगे कपडे, उबदार कपडे, सॅनिटरी नॅपकिन्स आणि घरगुती वापरात येणाऱ्या वस्तू, इत्यादी वस्तू स्वीकारल्या जातील.

मात्र, या शिबिरात रोख स्वरूपात मदत स्वीकारली जाणार नाही.


येथे असेल शिबिर
रविवार आणि सोमवार (11 आणि 12 ऑगस्ट 2019) या दोन्ही दिवशी सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत हे शिबिर आयोजित करण्यात आले आहे. कसबा पेठेतील दारूवाला पुलाजवळील श्री राधाकृष्ण मंदिर देवस्थानात या वस्तू स्वीकारण्यात येणार आहेत.

अधिक माहितीसाठी संपर्क क्रमांक
उमेश – 9011095621
विशाल – 9766165416
मुनीष – 9850270280
संदीप – 7774032905

Ads

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)