मुंबई विमानतळावरुन एका सोने तस्करास अटक

मुंबई- मुंबई विमानतळावर चप्पलमधून सोन्याची तस्करी करणाऱ्या एका आरोपीस एसीआयएसएफने ताब्यात घेतले आहे. राहत अली असे 51 वर्षीय आरोपीचे नाव असून तो भारतीय नागरिक आहे.

राहत अली बहरीनहून दिल्लीला येत होता. मुंबईच्या डोमेस्टिक एअरपोर्टवर सकाळी सातच्या सुमारास तपासणीवेळी त्याच्या चप्पलमध्ये धातू असल्याचे समजले. यानंतर सीआयएसएफच्या कर्मचाऱ्यांनी त्याला चप्पल एक्‍स-रे मशीनमध्ये चेक केली असता, स्लिपर्सच्या सोलमध्ये सोन्याचे बार आढळले.

381 ग्रॅम वजनाच्या या दोन सोन्याच्या बारची किंमत अंदाजे 11 लाख 12 हजार 139 रुपये असावी, असे पोलिसांनी सांगितले. तपासादरम्यान त्याला कोणताही वैध कागदपत्रे सादर करता आली नाहीत.
सीआयएसएफने हे सोन्याचे बार आणि आरोपीला कस्टम विभागाच्या ताब्यात दिले असून पुढील तपास सुरु आहे. त्याच्या कस्टम कायद्याअंतर्गत तस्करीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.