नवी दिल्ली- राजधानी दिल्लीत सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यावरून दोन जणांत झालेल्या हाणामारीत एकाचा मृत्यू झाला असून दुसराही जखमी झाला आहे. अंकीत असे मरण पावलेल्या व्यक्तीचे नाव आहे. तो वाहनचालक होता. तर या हाणामारीत प्रवीण नावाचा अन्य व्यक्ती जखमी झाला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार बुधवारी रात्री ही घटना घडली. सार्वजनिक ठिकाणी थुंकण्यास मनाई आहे. त्याकरता हजार रूपये दंडही आकारला जातो. याच मुद्दयावरून प्रवीण आणि अंकित यांच्यात वाद झाला व त्याचे पर्यावसन बाटल्यांनी परस्परांना मारहाण करण्यात झाले. त्यात अंकितला जीव गमवावा लागला. प्रवीण हा अभियंता असून त्याला ताब्यात घेण्यात आले आहे.