दुर्दैवी | बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटायला गेलेल्या भावाचा अपघाती मृत्यू

गडचिरोली – बहिणीच्या लग्नाची पत्रिका वाटून घरी परतत असताना दुचाकीवरून तोल गेल्याने अपघातात भावाचा जागीच मृत्यू झाला. तर इतर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. ही घटना बेळगाव-झनकारगोंदी फाट्यावर घडली. लग्नानिमित्त घरात आनंदाचे वातावरण असताना अपघाताची घटना घडल्याने हळहळ व्यक्त होत आहे.

पवन केजाराम दवांगन (वय 25) याचा अपघातात जागीच मृत्यू झाला. तर प्रमोद करंगसू देवांगन (वय 24) व जागेश्वर पंचराम देवांगन (वय 19, रा. कोचीनारा) हे दोघे गंभीर जखमी झाले आहेत.

येत्या 14 तारखेला पनवच्या बहिणीचे लग्न आहे. त्यामुळे घरात सर्वत्र आनंदाचे वातावरण होते. साखरपुडा झालेला होता. पवन त्याचे चुलत भाऊ प्रमोद व जागेश्वर यांच्यासोबत लग्नाची पत्रिका वाटण्यासाठी गेला होता. पत्रिका वाटून परतत असताना दुचाकीवरून तोल जाऊन अपघात झाला. यात पवनचा जागीच मृत्यू झाला असून इतर दोघांवर करोची ग्रामीण रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.