कराडमध्ये अपघात एकाचा जागीच मृत्यू तर, एक जखमी

कराड : वसंतगड (ता. कराड) येथील बसस्थानकाजवळ एसटी बस व दुचाकीची समोरासमोर धडक होऊन दुचाकीवरील अभिजित नंदकुमार काकडे (वय २५) या तरुणाचा म्रुत्यू झाला आहे. तर जगदीश बिळासाहेब जाधव (वय ३४) जखमी झाले आहेत.

याबाबत अधिक माहिती अशी की, अभिजित लहानपणापासून मल्हारपेठ येथील मामाकडे राहण्यास होता. शनिवारी मित्रासमवेत तो कराडला निघाला होता. वसंतगडजवळ कराडहून तांबवेला निघालेल्या बस (एम.एच.१४- बीटी ०३४६) व दुचाकी (एम.एच.५०- एफ ८०५८) यांच्यात धडक झाली. आणि अभिजितचा जागीच मृत्यू झाला.

दरम्यान, या अपघातात जाधव गंभीर झाले, असून त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात घटनेची नोंद झाली नव्हती.

Leave A Reply

Your email address will not be published.