खोरेगाव : जांब बुद्रुक (ता. कोरेगाव) येथे गुरुवारी सकाळी साडेअकरा वाजण्याच्या सुमारास मातंग वस्तीतील सार्वजनिक विहिरीमध्ये पाय घसरून पडल्याने आबा जयसिंग निकम (वय ४९) यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी कोरेगाव पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यू अशी नोंद करण्यात आली आहे.
गावात विहिरीचे काम सुरू होते.
ते काम पाहत असताना अचानक पाय घसरून पडल्याने आबा निकम यांचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. याप्रकरणी राजेंद्र कृष्णात निकम यांनी पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल दिली आहे. पोलिसांनी घटनास्थळी पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी कोरेगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल केला. हवालदार ज्ञानदेव साबळे तपास करत आहेत.