रांजणगावतील भीषण अपघातात एक जण ठार

रांजणगाव – गणपती येथे महागणपती मंदिरा समोर पुणे-नगर महा मार्गावर दोन मोठ्या वाहनांची समोरा-समोर जोरदार धडक झाल्याने झालेल्या भीषण अपघातात एक जण जागीच ठार झाला झाला आहे.तर दोन जण गंभीर जखमी झाली असल्याची माहिती रांजणगाव पोलिसांनी दिली. बाबाजी हरीभाऊ गर्जे असे या अपघातात मृत पावलेल्या वाहन चालकाचे नाव आहे. तर इतर दोन जण या अपघातात जखमी झाले असल्याचे रांजणगाव पोलीसांनी सांगितले.

या बाबत सविस्तर वृत्त असे की, एम एच २३ डब्ल्यु ७६२५ हे वाहन पुण्याहून अहमदनगर च्या दिशेने येत असताना रांजणगाव येथे महागणपती मंदिरा समोर नगरहून पुण्याच्या दिशेने भरधाव वेगाने चाललेले वाहन डब्ल्यु.बी. १९ जी ८१५१ हे भरधाव वेगात असल्यामुळे त्याचा वाहनावरील ताबा सुटल्यानंतर कंटेनर भेट समोरच्या कंटेनर वर धडकल्याने पुण्याहून नगरच्या दिशेने चाललेल्या वाहनातील चालक जागीच ठार झाला असुन इतर दोन जण गंभीर जखमी झाले आहे.

शुक्रवारी पहाटे चार च्या सुमारास ही घटना घडली असुन या अपघातामुळे पुणे-नगर महा मार्गाच्या दुतर्फा दहा किलोमीटर पर्यत वाहनांच्या रांगा लागल्याने वाहन धारकांना , कामगारांना व शालेय विद्यार्थ्यांना वाहतुक कोंडीचा सामना करावा लागला..पुढील तपास रांजणगाव पोलिस स्टेशनचे पोलीस निरीक्षक मनोजकुमार यादव यांच्या मार्गदर्शनानुसार करण्यात येत आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.