नवी दिल्ली : दिल्लीमधील पटपडगंज औद्योगिक परिसरातील प्रिंटींग प्रेसला भीषण आग लागली. आज सकाळी ही आग लागल्याचे सांगण्यात येत आहे. तर या आगीत आतापर्यंज एकाचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येत आहे. एका वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार अग्निशमन दलाच्या 35 गाड्या घटनास्थळी आग विझवण्याचे काम करत आहेत.
Delhi: Fire broke out at a paper printing press in Patparganj Industrial Area today, one person dead. 35 fire tenders are present at the spot. pic.twitter.com/7syFT5yF7V
— ANI (@ANI) January 9, 2020
दिल्ली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार पटपडगंज औद्योगिक क्षेत्रातील प्रिंटिंग प्रेसला ही भीषण आग लागली आहे. आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. डिसेंबरपासून दिल्लीत आग लागण्याच्या घटना वारंवार समोर येत आहेत. 8 डिसेंबरला दिल्लीतील धान्य बाजार परिसरातील एका चार मजली इमारतीला भीषण आग लागली होती यात एकूण 43 जणांचा मृत्यू झाला होता. मृतांमध्ये उत्तर प्रदेश आणि बिहारमधून आलेल्या कामगार वर्गाचा समावेश होता. त्यानंतर 9 डिसेंबरला त्याच इमारतीला पुन्हा आग लागली होती.
या घटनेला दोन आठवडे उलटत नाही तोच किराडी परिसरातील कपड्याच्या गोदामाला 23 डिसेंबरला मध्यरात्री आग लागली होती या आगीत 9 जणांचा मृत्यू झाला होता. डिसेंबर महिन्यात आगीची तिसरी मोठी घटना दिल्ली पूर्व मधल्या क्रिष्णा नगर परिसरात घडली होती. सुदैवाने अग्निशमन दलाने जीव धोक्यात घालून 40 जणांची सुटका केली होती.