इंद्रायणी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचा एकदिवसीय लाक्षणिक संप

तळेगाव : तळेगाव स्टेशन येथील इंद्रायणी महाविद्यालयातील शिक्षकेतर कर्मचारी महाराष्ट्र राज्य व महाविद्यालयीन व विद्यापीठीय सेवक संयुक्त कृती समितीच्या निर्देशानुसार महाविद्यालयीन व विद्यापीठीय शिक्षकेतर कर्मचाऱ्याचे दि 16 नोव्हेंबर पासून सुरू झालेल्या राज्यव्यापी आंदोलनात सहभागी झाले.

असून दि 22 नोव्हेंबर रोजी एक दिवसाच्या लाक्षणिक संपावर गेले होते. त्यांच्या शासन स्तरावर अनेक मागण्या प्रलंबित असून त्यामध्ये प्रामुख्याने सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना पुनर्जीवीत करावी, वेतन आयोगातील त्रुटी दूर करून फरक रोख रकमेने देण्यात यावा, समान काम समान वेतन देण्यात यावे, शिक्षकेतर कर्मचारी भरती बंदी उठवून भरती करण्यात यावी जेणेकरून कामाचा ताण कमी होईल.

अशा एकूण 27 प्रमुख मागण्यांसाठी वेळोवेळी शासनाकडे पाठपुरावा केला असून त्यांच्या मागण्या मान्य करण्यात याव्यात यासाठी आज एकदिवसीय लाक्षणिक संप पुकारण्यात आला होता यामध्ये इंद्रायणी महाविद्यालयातील 30 शिक्षकेतर कर्मचारी यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.