पुणे – राष्ट्रीय हिवताप निर्मूलन कार्यक्रमामध्ये प्रशासकीय सुसूत्रता व कामकाजात सुधारणा करण्याच्या गोंडस नावाखाली जिल्हा हिवताप कार्यालयातील आहरण व संवितरण अधिकार जिल्हा परिषदेकडे हस्तांतरित केले आहेत. याविरोधात प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्ग संघटना (हिवताप व व हत्तीरोग विभाग), महाराष्ट्र राज्य शासकीय कर्मचारी संघ व हिवताप योजना हस्तांतरणविरोधी संघर्ष समितीच्या वतीने आरोग्य भवन विश्रांतवाडी येथे एकदिवसीय लाक्षणिक उपोषण करण्यात आले.
प्रशासकीय कामकाजात सुधारणा करण्याबाबतचे परिपत्रक रद्द करावे, विशेष वेतन व ग्रेड वेतन याबाबतचे प्रस्ताव वित्त विभागास तात्काळ सादर करावे. तसेच पदोन्नती व कालबद्ध पदोन्नती तात्काळ करावी, अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या.