द रियल लाईफ ‘नायक’; एका दिवसासाठी उत्तराखंडच्या मुख्यमंत्रीपदी सृष्टी गोस्वामी

देहरादून : अभिनेता अनिल कपूरच्या नायक चित्रपटाचे अनेक जण फॅन असतील..पण अनिल कपूरच्या एका दिवसाच्या मुख्यमंत्र्यांची भूमिका सत्यात उतरवण्याचे काम एका तरुणीने केले आहे. हरिद्वारची सृष्टी गोस्वामी एक दिवसांची उत्तराखंडची मुख्यमंत्री झाली. विधानसभा भवनात राज्याचे मंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी त्यांचे स्वागत केले. मुख्यमंत्री म्हणून सृष्टीने जवळपास डझनभर विभागांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक घेतली आणि अनेक सूचनाही केल्या.

राष्ट्रीय बालिका दिनाच्या निमित्ताने हरिद्वारच्या सृष्टी गोस्वामीला एका दिवसासाठी उत्तराखंडची मुख्यमंत्री होण्याची संधी मिळाली. यासाठी स्वीकृति आणि निर्देश मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांच्याकडून देण्यात आले. मुख्यमंत्रीच्या पदावर असताना सृष्टी गोस्वामीने अधिकारिऱ्यांना अनेक निर्देश दिले. त्यांनी प्रदेशातील जुन्या पुलांना ठिक करण्याच्या सूचनाही केल्या आहेत.

सृष्टी गोस्वामीने विधानसभा भवनात दुपारी 12 ते 3 वाजेपर्यंत समिक्षा बैठक घेतली. दुपारी तीन वाजेनंतर बालिका निकेतनचे निरीक्षण केले आणि येथील मुलींसोबत दुपारचे जेवन केले. त्यानंतर सायंकाळी साडे चार वाजता हरिद्वारकडे प्रस्थान केले.

मुख्यमंत्री त्रिवेंद्र सिंह रावत यांनी सांगितले, मुलींना सशक्त करण्याच्या दिशेने आम्ही प्रयत्नशील आहोत. आमच्या प्रदेशातील मुली कुणापेक्षा कमी नाही हा मेसेज लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला. देशाच्या महिलां प्रत्येक क्षेत्रात नाव कमावत आहेत. आमच्या या निर्णयानाने लोकांपर्यंत संदेश जाईल की मुलींना प्रोत्साहन दिलं तर त्या काहीही करु शकतात.

एका दिवसाची मुख्यमंत्री बनलेली सृष्टी गोस्वामीने सांगितले, त्यांनी काही महत्वपूर्ण निर्देश अधिकाऱ्यांना दिले. त्याशिवाय, मुलींची शिक्षा आणि सुरक्षेबाबत आपली चिंता व्यक्त केली. उच्च शिक्षा मंत्री धन सिंहने या प्रयत्नासाठी मुख्यमंत्री रावत यांचे आभार मानले.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.