फलटण-कोरेगाव मतदारसंघात रस्त्यांसाठी एक कोटींचा निधी

फलटण – फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील रस्त्यांसह 34 कामांसाठी 2019-20 या आर्थिक वर्षात ग्रामविकास व पंचायत राज विभागाने एक कोटी रुपयांचा निधी दिला आहे. विधानपरिषदेचे सभापती रामराजे नाईक निंबाळकर, आ. दीपक चव्हाण यांच्या प्रयत्नातून हा निधी मिळाल्याची माहिती जिल्हा परिषद अध्यक्ष संजीवराजे नाईक निंबाळकर यांनी दिली.

फलटण तालुक्‍यात आळजापूर, आदर्की बुद्रुक, आदर्की खुर्द, ढवळेवाडी (आसू), आसू, पाटणेवाडी, तिरकवाडी, कुरवली बुद्रुक, सोनवडी बुद्रुक, जिंती, शिंदेनगर, साखरवाडी, जाधवनगर, जाधववाडी, गिरवी, सर्कलवाडी, पाडेगाव, फरांदवाडी, पिंप्रद येथे अंतर्गत रस्ते, पाटणेवाडी येथे सीडीवर्क, वेळोशी ग्रामपंचायत इमारत सुधारणा व पेव्हर ब्लॉक, मालोजीनगर (कोळकी) येथे पाईप गटार, कोरेगाव तालुक्‍यात दहिगाव, नांदवळ, निरगुडी, घिगेवाडी, आसनगाव, सोनके, रणदुल्लाबाद, पिंपोडे येथे अंतर्गत रस्ते, करंजखोप येथे सिमेंट रस्ता, या कामांसाठी एक कोटींचा निध मिंजूर करण्यात आला आहे. निविदा काढून तातडीने ही कामे हाती घेण्यात येणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.