ग्रामपंचायत विभागातर्फे इंदापुरात एक कोटींचा निधी

जिल्हा परिषद सभापती प्रवीण माने यांची माहिती
पुणे – जिल्हा परिषद निधी तसेच जिल्हा वार्षिक योजना, ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान 2019- 2020 मधील निधी अंतर्गत कामे मंजूर केली आहेत. ग्रामपंचायत विभागातंर्गत इंदापूर तालुक्‍यातील विविध विकासकामांसाठी एक कोटी सात लाख 80 हजार रुपयांचा भरीव निधी मंजूर केल्याची माहिती जिल्हा परिषदेचे बांधकाम आणि आरोग्य समितीचे सभापती प्रवीण माने यांनी दिली.

माने म्हणाले की, इंदापूर तालुक्‍यातील नागरिकांना दर्जेदार रस्ते आणि मुलभूत सुविधा देण्यासाठी हा निधी मंजूर करण्यात आला आहे. यात प्रामुख्याने स्मशानभूमी शेड, दुरूस्ती, रस्ते बांधकाम आदी कामांसाठी हा निधी देण्यात आला आहे. ही कामे लवकरात लवकर पूर्ण करण्यात येणार आहे. सर्व कामे गुणवत्तापूर्ण व दर्जेदार करण्यात येणार आहे. स्थानिक विकास कार्यक्रम निधीतून लामजेवाडी येथील स्मशानभूमीसाठी 5 लाख 60 हजार रुपये मंजूर करण्यात आले आहेत. जिल्हा वार्षिक योजनेतून ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान देण्यात आले आहे.

यामध्ये कौठुळी (5 लाख 60 हजार), भाटनिमगाव (5 लाख 60 हजार), लासुर्णे (बजरंगवाडी) (5 लाख 60 हजार), भोंडणी (शहाजीनगर कारखाना) (5 लाख 60 हजार), लासुर्णे (5 लाख 60 हजार), वरकुटे बुद्रुक (करेवाडी- गणपत करेवस्ती) (5 लाख 60 हजार), शिरसटवाडी (5 लाख 60 हजार) या गावांना भरीव निधी देण्यात आला आहे. हा एकूण निधी 44 लाख 80 हजारांचा आहे. स्मशानभूमी सुधारणासाठी निमसाखरसाठी 6 लाख रूपयांचा तर रूई (थोरातवाडी) येथे तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. इंदापूर तालुक्‍यात ग्रामपंचायतींना जनसुविधांसाठी विशेष अनुदान मंजूर करण्यात आला आहे. यामध्ये भिगवण (3 लाख), शहा (महादेवनगर) (3 लाख), जांब (3 लाख), वडापुरी (3 लाख), आनंदनगर (3 लाख), सराफवाडी (3 लाख), निरगुडे (3 लाख), असा एकूण तीन लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.

माने म्हणाले की, वाहतूक दळणवळणाच्या सुविधा दर्जेदार व्हावेत, यासाठी रस्ते बांधकामासाठी विशेष अनुदान देण्यात आले आहे. रेडणी ते दिनकर खाडेवस्ती रस्त्यासाठी सहा लाख, निमसाखर ते जाधववस्ती रस्त्यासाठी सहा लाख, भाटनिमगाव ते बेडशिंग शीव रस्त्यासाठी सहा लाख, रेडा सराफवाडी ते महादेवनगर लोंढेनगर रस्त्यासाठी सात लाख, रूई अंतर्गत रस्त्यासाठी चार लाख, ग्राम पडस्थळ येथील कोटलिंग मंदिराकडे जाणाऱ्या रस्त्यासाठी चार लाख रुपयांचे अनुदान मंजूर करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)