नांदूर -सहजपूर (ता. दौंड) येथे शुक्रवार (दि.7) पुन्हा करोना बाधित सापडल्याची माहिती यवत ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. शशिकांत इरवाडकर यांनी दिली आहे.
दौंड तालुक्याच्या सीमेवर असलेल्या औद्योगिक वसाहतीमध्ये तालुक्यासह पुणे, बारामती, पिंपरी- चिंचवड शहरातील अनेक कामगार, अधिकारी काम करतात. त्यामुळे संक्रमण वाढत आहे.
सहजपूरचे सरपंच निलेश म्हेत्रे म्हणाले की, संबंधिताची कागदोपत्रे माझ्याकडे आली नाहीत. नागरिकांच्या आरोग्याचा प्रश्न निर्माण झाला आहे. याबाबत कोणीही राजकारण करू नये, असे आवाहन त्यांनी केले.