शिक्रापूर -सणसवाडी (ता. शिरूर) येथे राहणाऱ्या एका इसमाने दारूच्या नशेत गळफास घेऊन आत्महत्या केली. शिक्रापूर पोलिसांनी येथे अकस्मात मृत्यूची नोंद केली असल्याची माहिती शिक्रापूर पोलिसांनी दिली आहे.दिगंबर विठ्ठल पवार असे आत्महत्या केलेल्याचे नाव आहे.
पवार हा दारू पिऊन घरी आलेला होता. त्यावेळी घरातील लहान मुले खेळण्यासाठी बाजूला गेले असताना त्याने दारूच्या नशेत घरात गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत विठ्ठल दत्तराम पवार यांनी फिर्याद दिली.