रांजणगाव गणपती – तू निलेश काळे याच्या आई-वडिलांना घेऊन येरवडा जेलमध्ये भेटायला का गेला’ असे म्हणून लोखंडी कोयत्याने मारहाण करून गंभीर जखमी केले. ही घटना कारेगाव (ता. शिरूर) येथे घडली आहे. याप्रकरणी रांजणगाव एमआयडीसी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.
प्रथमेश सुनील यादव (वय 18, मोटेवाडी ता. शिरूर) यांनी पोलिसांत तक्रार केली आहे. संकेत काळे, समीर शेलार, अक्षय काळे, हरिश काळे, जीवन भोस (सर्व रा. निमोणे), साहिल गाडे (रा. गुनाट), विकास रोडे (रा. करडे) व दोन अनोळखी जणांविरोधात तक्रार दाखल
केली आहे.
गुरुवारी (दि.28) रात्री साडेअकराच्या सुमारास आरोपी त्यांच्याकडील तीन मोटरसायकलवरून आले होते. संकेत काळे याने निलेश काळे यांच्या आई-वडिलांना घेऊन लोणीकंद पोलीस स्टेशनकडील खुनाच्या गुन्ह्यात अटक असलेल्या निलेश काळे याला येरवडा जेलमध्ये
भेटण्यासाठी गेल्याचे कारणावरून फिर्यादीस म्हणाला की, तुला लई माज आला आहे का, तू निलेश काळे याच्या आई-वडिलांना घेऊन येरवडा जेलमध्ये भेटायला का गेला असे म्हणून फिर्यादीच्या डोक्यात वार करून गंभीर जखमी केले. पुढील तपास रांजणगाव एमआयडीसी करीत आहेत.