घरफोडी करणाऱ्या चोरास समर्थ पोलिसांनी केली अटक

घरफोडी करणाऱ्या चोरास समर्थ पोलिसांनी केली अटक

पुणे- घरफोडी करणाऱ्या चोरास समर्थ पोलिसांच्या पथकाने सापळा रचून अटक केली. त्याने घराच्या उघड्या दरवाजावाटे प्रवेश करत 12 हजाराची रोकड चोरली.सत्यम रंगय्या मामडी(20,रा.सोमवार पेठ) असे अटक आरोपीचे नाव आहे.

याप्रकरणी बिना अजितकांत गिर(21,रा.सोमवार पेठ) यांनी समर्थ पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. गिर यांच्या घराचा दरवाजा उघडा असताना चोरट्याने आत प्रवेश करत टेबलाच्या कप्प्यात ठेवलेली 12 हजाराची रोकड लांबवली होती. हा गुन्हा 9 जानेवारी रोजी घडला होता. गुन्हा दाखल झाल्यावर तपास करताना आरोपीची कोणतीही माहिती तसेच सीसीटीव्ही फुटेज मिळाले नव्हते. यामुळे पोलिसांना तपासात अडथळे येत होते. मात्र एका नागरिकाने पोलिसांना संबंधित चोरटा शाहू उद्यानाजवळील भाजी मंडईजवळ येणार असल्याची माहिती दिली. त्यानुसार सापळा रचून आरोपीस ताब्यात घेतले. त्याच्याकडून चोरी केलेल्या रकमेतील दहा हजाराची रोकड घरातून हस्तगत करण्यात आली.

ही कारवाई पोलीस उपायुक्त स्वप्ना गोरे, सहायक पोलीस आयुक्त प्रदीप आफळे, वरिष्ठ पोलीस निरीक्षक बाळकृष्ण कदम, पीएसआय कापुरे, यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हवालदार राजस शेख, सुनील लोणकर, पोलीस शिपाई साहिल शेख, अनिल शिंदे, निलेश साबळे, स्वप्निल वाघोले, गणेश शेंडे आणी सचिन गोरखे यांच्या पथकाने केली. याप्रकरणाचा तपास पोलीस हवालदार राजस शेख करत आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.