ठाणे – ठाण्याच्या वीज मंडळाच्या कार्यालयाला लागलेली आग ही दुर्घटना नसून तो घातपाताचा प्रकार असल्याचे निष्पन्न झाले असून या प्रकरणी संबंधीत आरोपीला अटक करण्यात आली आहे. 6 आणि 7 फेब्रुवारीच्या रात्री हा प्रकार घडला होता.
राज्य वीज वितरण कंपनीचे हे कार्यालय वागळे इस्टेट येथे आहे. आगीत प्राणहानी झाली नसली तरी मंडळाच्या कार्यालयाचे मोठे नुकसान यात झाले आहे. या प्रकरणात लक्ष्मण राखुंडे नावाच्या इसमाला अटक करण्यात आली आहे. हा इसम संबंधीत कार्यालयात चोरीच्या इराद्याने घुसला होता, पण त्याला तेथील वॉचमनने पकडून चोप दिल्याने तो संतापला होता.
त्याचा बदला त्याने या कार्यालयाला आग लाऊन घेतला. त्या आगीत कार्यालयातील फर्निचर आणि कंपनीची बरीच कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. सीसीटीव्हीत हे दृष्य कैद झाले होते त्यानुसार पोलिसांनी या इसमाला अटक केली आहे.