अफगाणी गांजा बाळगल्याप्रकरणात एकाला जामीन

पुणे – अफगाणी गांजा बाळगल्याप्रकरणात अटक केलेल्या एका नागरिकाला विशेष न्यायाधीश व्ही.पी.अदोणे यांनी 30 हजार रुपयांचा जामीन मंजुर केला आहे. सौरीन शैलैशे शहा (वय 26, सांताक्रुझ, मुंबई) असे त्याचे नाव आहे. त्याने ऍड. पुष्कर दुर्गे यांच्यामार्फत जामिनासाठी अर्ज केला होता.

सिंहगडरोड पोलिसांनी 21 जानेवारी रोजी दुपारी 3.55 च्या सुमारास वडगाव बुद्रुक येथील सार्वजनिक रस्त्यावर कारवाई करत अक्षय प्रकाश शेलार याला गांजा बाळगल्याप्रकरणी अटक केली.  

त्याच्याकडून अफगाणिस्तान अथवा कॅनडा देशातील 66 ग्रॅम वजनाचा 3 लाख 30 हजार रुपये किंमतीचा ओजी कुष गांजा आणि दुसरा 1 किलो 84 ग्रॅम जप्त करण्यात आला. पोलीस तपासात हा गांजा सौरीन याच्याकडून आणल्याचे अक्षय याने सांग़ितल्याने पोलिसाने त्याला अटक केली.

त्याने न्यायालयीन कोठडीत असताना जामिनासाठी अर्ज केला. दुसऱ्या आरोपीच्या सांगण्यावरून त्याला अटक करण्यात आली आहे. त्याच्याकडून गांजा जप्त करण्यात आलेला नाही. त्याने एनडीपीएस कायद्यानुसार गुन्हा केलेला नाही.

त्यामुळे त्याला जामीन देण्याची मागणी ऍड. पुष्कर दुर्गे यांनी केली. त्यामुळे पुढील आदेश येईपर्यंत सकाळी 11 ते दुपारी 2 या वेळेत सिंहगडरोड पोलीस स्टेशनला हजेरी लावण्याच्या अटीवर न्यायालायाने हा निकल दिला.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.