खूनप्रकरणी सख्ख्या बहिणीसह एक जण ताब्यात

कराड – येथील वाखाण भागात शनिवारी उज्वला ठाणेकर यांचा घरात शिरून तीचा धारदार शस्त्राने गळा चिरुन खून झाला होता. या महिलेच्या खून प्रकराणी कराड शहर पोलिसांसह सातारच्या एलसीबीच्या पथकाने तीच्याच सख्या बहिणीसह युवकास ताब्यात घेतले आहे. त्या प्रकरणात तीचीच सख्की बहिण पोलिसांच्या चौकशी रडावर आहे.

 तीनेच खून केल्याचे तपासात पुढे आले आहे. त्या बहिणासह तीच्या परिचीत एकास पोलिसांनी रात्री ताब्यात घेतले आहे. त्यांनीही खूनाची कबुली दिल्याचे खात्रीशीर वृत्त आहे. पोलिसांनीही खूनाचा छडा लागल्याच्या वृत्तास दुजोरा पोलिसांनी दिला आहे. संशयीत देत असलेल्या माहितीची खात्री केल्यानंतर उद्यापर्यंत सर्वच माहिती स्पष्ट होईल, असे पोलिसांनी सांगितले.

वाखाण भागात उज्वला ठाणेकर यांचा गळा चिरुन खून झाला होता. शनिवारी सकाळी ती धक्कायदायक घटना उघडकीस आली. त्याबाबत तीचेच नातेवाईक सचिन निगडे यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. निगडे उज्वलाच्या बहिणीचे पती आहे. ते मलकापूरात राहतात. त्यांच्या पत्नीला पोलिसांनी उज्वला यांच्या खून प्रकरणात एक युवकासह अटक केली आहे. काल खूनानंतर पोलिसाची तपासाची चक्रे फिरली आहेत.

त्यात शहर पोलिसांची तीन पथके वेगवगेळ्या दिशेला तपासासाठी रवाना झाली होती. एलसीबीही पथकही येथे ठाण मांडून होते. उज्वला पतीसमवेत राहत नव्हती. ती एकटी राहत होती. तीच्या घरी सचिन निगडे येत होते. त्यांचे येणे निगडे यांच्या पत्नीला म्हणजेच उज्वला हीच्या बहिणाला खटकत होते.

तोच राग मनता धरून खून झाला असावा, असा पोलिसांचा अंदाज आहे. त्याच संशयावरून एलसीबीने उज्वला हिच्या बहिणीला ताब्यात घेतले. त्यावेळी तीने त्याची कबुली देत आपल्यासोबत आणखी एकजण समील असल्याची माहिती पोलिसांना दिली. त्यालाही पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उज्वलाची बहिण व तीचा परिचीत युवकाकडे पोलिसांचा तपास सुरू आहे. खूनाची कबुली दिली असली तरी अन्य गोष्टींचीही खात्री करण्याचे काम सुरू आहे. त्यामुळे अधिक माहिती मिळू शकली नाही.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.