शिरूर -शिरूर तालुक्यातील गोरगरीब व गरजू लोकांना धान्य द्यावे या आमदार अशोक पवार यांच्या आव्हानाला शिरूरच्या बाजार समिती आवारातील व्यापाऱ्यांनी साथ देऊन जवळपास साडेतीन टन अन्नधान्य तहसीलदारांकडे सुपूर्द केले.
लॉकडाऊनमुळे अनेक गरीब व बेघर लोकांना अन्न धान्याचा तुटवडा जाणवत आहे. अशा बिकट प्रसंगी तालुक्याचे आमदार अशोक पवार यांनी सर्वांना मदतीचे आवाहन केले असता, शिरूर कृषी उत्पन्न बाजार समितीचे यार्डमधील सर्व व्यापाऱ्यांनी माणुसकीच्या भावनेतून सुमारे 35 क्विंटल गहू, तांदूळ, तूरडाळ, तेल आदी अन्न धान्य व किराण्याची मदत आमदार पवार यांच्या हस्ते तहसीलदार लैला शेख यांच्याकडे सुपूर्द केली.
यावेळी सभापती शशिकांत दसगुडे, संचालक प्रवीण चोरडिया, बंडू जाधव, माजी संचालक संतोष भंडारी, सचिव अनिल ढोकले, पोलीस निरीक्षक खानापुरे, शहर राष्ट्रवादी अध्यक्ष मुजफ्फर कुरेशी तसेच यार्डवरील आडतदार उपस्थित होते.