पुणे : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या खडकवासला धरण साखळीत एका रात्रीत दीड टीएमसी पाणी वाढले आहे. त्यामुळे खडकवासला, पानशेत वरसगाव आणि टेमघर या चारही धरणाचा पाणीसाठा १०.६६ टीएमसी वरून थेट १२.०७ टीएमसी झाला आहे.
दरम्यान, मागील १२ तासात या चारही धरणात अतिवृष्टी सदृश पासून झाला आहे. त्यात खडकवासला ६५ मिमी, पानशेत १७७ मिमी, वरसगाव १६५ मिमी तर टेमघर धरणात तब्बल १७० मिमी पावसाची नोंद झाली आहे.