कॅन्सरवर मात करण्यासाठी ऑन्कोचे विशेष योगदान : खा. उदयनराजे

शेंद्रे-खिंडवाडी जोडरस्त्याच्या डांबरीकरणाचा शुभारंभ

सातारा  – कॅन्सरसारख्या आजारावर मात करत रुग्णांना विशेष सेवा पुरविण्याचे उत्कृष्ट काम साताऱ्यातील शेंद्रे येथील ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्यावतीने केले जात असल्याचे गौरवोद्गार काढत खा. उदयनराजे भोसले यांनी हॉस्पिटलचे चेअरमन श्री उदय देशमुख यांच्या कार्याचे विशेष कौतूक केले.

सोमवार दि. 18 रोजी शेंद्रे-खिंडवाडी या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाच्या शुभारंभप्रसंगी ते बोलत होते. यावेळी ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरच्या माध्यमातून पुरविण्यात आलेल्या रुग्णसेवांचेही त्यांनी कौतुक केले. शेंद्रे गावापासून ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटरमार्गे महामार्गाला जोडणारा शेंद्रे-खिंडवाडी या जोड रस्त्याच्या डांबरीकरणाला सुरुवात झाली आहे. या रस्त्यामुळे येथील आसपासच्या गावातील लोकांना ऑन्को रूग्णालय आणि महामार्ग असा प्रवास करता सोयिस्कररित्या करता येणार आहे.

यानिमित्ताने आयोजित कार्यक्रमात पाहुण्यांचे स्वागत ‘ऑन्को लाईफ कॅन्सर सेंटर’चे चेअरमन उदय देशमुख आणि संचालक डॉ. प्रताप राजे महाडिक यांनी केले. याप्रसंगी माजी शिक्षण सभापती सुनिल काटकर व सार्वजनिक बांधकाम विभागातील सहाय्यक अभियंता राहुल आहिरे, शाखा अभियंता रवीकुमार आंबेकर, कनिष्ठ अभियंता संजय तवले तसेच शेंद्रे व खिंडवाडी परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave A Reply

Your email address will not be published.