“समोर मरण दिसत होतं आणि… “;उत्तराखंड दुर्घटनेतील पिडीतांनी सांगितली आपबिती

चमोलीः उत्तराखंडमधील चमोलीमध्ये हिमकडा कोसळून मोठा हाःहाकार माजला. यात अनेक जणांचा मृत्यू झाला आहे. आता सुद्धाही काही जण दुर्घटनेत अडकलेले आहेत. तसेच काही लोकांना रेस्क्यू करून सुरक्षितरीत्या बाहेर काढण्यात आले. चमोलीच्या दुर्घटनेतून जिवंत बचावलेल्या लोकांनी आपल्यासोबत घडलेल्या घटनेची आपबिती सांगितली आहे.

एक वेळा असं वाटलं आता काही आपण आपल्या कुटुंबीयांना भेटत नाही. आतमध्ये श्वास घेणंसुद्धा अवघड झालं होतं. त्याच दरम्यान एका छोट्याश्या फटीतून हवा आत येत होती. एका वर्करकडे फोन होता, त्यानं तात्काळ बाहेर सूचना दिली. काही वेळानंतर पाण्याचा स्तर कमी होत गेला आणि आम्ही सुखरूप बचावलो. चमोलीच्या ढाक गावात राहणाऱ्या सूरजने सांगितले की, दुर्घटनेदरम्यान एक मोठा आवाज झाला. त्यानंतर आम्ही प्रकल्पाच्या साईटवरच अडकलो.

ढाक गावचे सुनील सांगतात, आम्ही बोगद्याच्या आत काम करत होतो. अचानक लोक जोरजोरात बाहेर येण्यासाठी ओरडू लागले. आम्हीसुद्धा घाबरलो आणि विचार केला नक्की काय झाले असेल. त्याचदरम्यान बोगद्यामध्ये मोठ्या प्रमाणात पाणी आले आणि आम्ही अडकलो. आम्ही बोगद्याच्या 300 मीटर आत होतो. लोखंडाच्या सळ्यांचा आधार घेऊन आम्ही कित्येक तास स्वतःचा बचाव केला.

तर हिमाचलच्या मंडी जिल्ह्यातील सतीश सांगतो, कंपनीत काम करत असताना अचानक हिमकडा कोसळल्याने पाण्याचा मोठा प्रवाह आला. आम्हाला काही समजेल तोपर्यंत आम्ही बोगद्यात अडकलो. बाहेरून काही लोक लवकर बाहेर या, असा आवाज देत होते. पाण्याचा प्रवाह मोठ्या प्रमाणात येत होता, त्यामुळे आम्ही बाहेर निघू शकतो नाही.

कित्येक तास अडकल्यानंतर आयटीबीपी आणि एनडीआरएफच्या टीमनं आमचा बचाव केला. आंध्र प्रदेशची एक व्यक्तीसुद्धा बोगद्यात अडकलेली होती. त्याला रेक्यू केल्यानंतर रुग्णालयात दाखल करण्यात आलं. रुग्णालयात दाखल नेपाळचे वसंत सांगतात, मी तपोनवच्या एका कंपनीत काम करतो. अपघातानंतर जवळपास 5 तास आतच अडकलेले होतो. आयटीबीपीच्या टीमने त्यांना आणि त्यांच्या साथीदारांना रेस्क्यू केले. तर जोशीमठात राहणारे धीरेंद्र सिंह पवार सांगतात, मीसुद्धा तपोवनच्या एका कंपनीत काम करतो. आज सकाळी 10 वाजता जोरदार आवाज झाल्यानंतर बोगद्यात पाणी भरलं. आम्ही बाहेर येणार तोपर्यंत पाणी आत शिरले. कित्येक तासांनंतर रेक्यू टीमनं आम्हाला सुखरूप वाचवले.

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.