मुंबई – अभिनेता रितेश देशमुख आपल्या कॉमेडी टायमिंगसाठी ओळखला जातो. रितेश सोशल मीडियावर आपल्या कुटुंबाबतच्या अनेक गोष्टी शेअर करत असतो. नुकतंच रितेशने एका मुलाखतीत शाहरुख खानबाबतचा एक भन्नाट किस्सा सांगितलं आहे. ज्यात त्याने आपल्या कॉफी प्रेमाचे श्रेय शाहरुख खानला दिले आहे.
रितेशने सांगितलेल्या किस्स्याचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होतोय. नेटफ्लिक्सच्या या व्हिडिओमध्ये रितेश देशमुख तमन्ना भाटियासोबत बोलताना दिसत आहे.यावेळी त्याने शाहरुखसोबतच्या कॉफी भेटीचाही उल्लेख केला आहे. रितेशने सांगितले की, शाहरुख माझ्या वडिलांना भेटण्यासाठी माझ्या घरी आला होता. मी शाहरुखचा एवढा मोठा चाहता आहे की, त्यावेळी त्याला भेटायला मी खूप उत्सुक होतो असं रितेशने यावेळी सांगितले.
View this post on Instagram
त्यावेळी घरी आलेल्या शाहरुख खानला सर्वांनी काहीतरी घेण्याचा आग्रह केला. त्यावर शाहरुखने ब्लॅक कॉफी घेतो असे सांगितले. त्यावर रितेश म्हणतो त्यावेळी मी पहिल्यांदा ब्लॅक कॉफी हा शब्द ऐकला. मला शाहरुखमुळे ब्लॅक कॉफी समजली असल्याचे रितेशने यावेळी स्पष्ट केले. तसेच यानंतर गेली अनेक वर्ष ब्लॅक कॉफी प्रेमाने पित असल्याचे देखील रितेशने यावेळी सांगितले.