‘सॅक्रेड गेम्स’ मधील गणेश गायतोंडे म्हणजेच, अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकीचा सध्या सोशल मीडियावर एक वेगळाच रोल पाहायला मिळत आहे. आपल्या आगामी ‘बोले चुडिया’ चित्रपटातील एका रॅप सॉंगची झलक त्याने शेअर केली असून, यामध्ये त्याचा एक हटके अंदाज दिसून येत आहे. या गाण्यात नवाजुद्दीन बरोबर अभिनेत्री तमन्ना भाटिया देखील दिसून येत आहे. सध्या नवाजचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे.
Excited to share the teaser of my first ever Rap song #Swaggychudiyan with @tamannaahspeaks for #BoleChudiyan directed by @ShamasSiddiqui. thank u team @woodpeckermv @Kiranzaveri9 #rajeshbhatia, @ZeeMusicCompany @kumaarofficial @anuragbedi pic.twitter.com/cIdVzk5rJQ
— Nawazuddin Siddiqui (@Nawazuddin_S) July 15, 2019
‘बोले चुडिया’ चित्रपटाचे दिग्दर्शन नवाजुद्दीनचा भाऊ शमास नवाब सिद्दीकी करणार आहे. पहिल्यांदाच शमास हा बोले चुडिया मधूम दिग्दर्शन करणार आहे.