‘क्वीन ऑफ खंडाळा’ नष्ट होण्याच्या मार्गावर

पुणे – ऑर्किड प्रजातील एक जुनी वनस्पती असलेली “क्वीन ऑफ खंडाळा’ ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर असून, भारतीय वनसर्वेक्षण विभागाने या वनस्पती “अतिधोकादायक’ परिस्थितीतील वनस्पती या गटात समावेश केला आहे. या वनस्पतीच्या संवर्धनासाठी विशेष प्रयत्न करण्याची गरज विभागाकडून व्यक्‍त करण्यात आली आहे.

आपल्या वैशिष्टपूर्ण रचनेतून सर्वांचे लक्ष वेधणाऱ्या “ऑर्किड’ या फुलाला नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळते. या फुलासाठी “क्वीन ऑफ खंडाळा’ ही “ऑर्किड’ प्रजातील वनस्पती केवळ खंडाळा परिसरातच आढळते. स्थानिक प्रजाती (एंडेमिक) म्हणून महत्त्व असलेल्या या वनस्पतीचे प्रमाण दिवसेंदिवस कमी होत असून, आता ही वनस्पती नष्ट होण्याच्या मार्गावर आहे. 1965 सालापर्यंत खंडाळा परिसरात असंख्य वनस्पती आढळत होती. मात्र, गेल्या काही वर्षांत वाढती बांधकामे, विविध विकास प्रकल्प, वनस्पतींबद्दल असलेली अनभिज्ञता यामुळे क्वीन ऑफ खंडाळा मोठ्या प्रमाणात नष्ट झाली असून, तिची उपलब्धता अतिशय दुर्मिळ झाली आहे. त्यामुळेच भारतीय वनसर्वेक्षण विभागाकडून “क्वीन ऑफ खंडाळा’ ही वनस्पती “अतिधोकादायक’ परिस्थितीतील वनस्पती या गटात सहभागी करण्यात आली आहे.

अतिधोकादायक प्रजाती या गटात सामाविष्ट करण्यात आलेल्या वनस्पतींच्या संवर्धनासाठी भारतीय वनसर्वेक्षण विभाग आणि केंद्रीय पर्यावरण मंत्रालय यांच्या माध्यमातून विशेष प्रयत्न केले जाते. त्यानुसार “क्वीन ऑफ खंडाळा’च्या संवर्धनासाठी देखील प्रयत्न सुरू असून, वनस्पतीशास्त्राच्या अभ्यासकांकडून यासंदर्भात अभ्यास सुरू असल्याचे भारतीय वनस्पती सर्वेक्षण विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. जीवन जलाल यांनी सांगितले.

“क्वीन ऑफ खंडाळा’विषयी
शास्त्रीय नाव : पेक्‍टालिसिस गिगान्टिआ
प्रजाती : ऑर्किड
रंग : पांढरा
उंची : 3 फूट
फुलण्याचा कालावधी : ऑगस्ट- सप्टेंबर
‘अतिधोकादायक’ परिस्थितीतील वनस्पती गटात समावेश

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.