करडईचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर

नगर  – जिल्ह्यात करडईचे पीक नामशेष होण्याच्या मार्गावर असल्याची माहिती तालुका कृषी अधिकारी नितनवरे यांनी दिली. नगदी पीकांच्या भाउगर्दीत करडईचे पीक परवडेनासे झाल्याने यंदा करडईचे क्षेत्र अवघे 1 टक्का सुद्धा नसल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या दहावर्षापासून करडईची लागवड दिवसेंदिवस कमी होत आहे. त्याचे मुख्यकारण म्हणजे नगदी पीके घेण्याकडे शेतकऱ्यांचा कल असून त्यात करडईचा निभाव लागेनासा झाला आहे.

त्याऐवजी शेतकऱ्यांचा कल ऊस, कापूस , सोयाबीन, ह्वारी,तूर या नगदी पीकांकडे वाढल्याने करडईचे क्षेत्र दिचसेंचिवस आकसत चालले आहे. एके काळी करडई पीलाचे क्षेत्र सर्वाधिक असायचे मात्र काळाच्या ओघात काही पिकांना मागणी वाढते तसेच काही पिकांचे कमी होते त्यानुसात शेतकरी पिकांची लागवड करतात.

मात्र आता करडईचे पीक पुरेसे लाभदायक राहिले नसल्याने शेतकऱ्यांनाही करडईत फारसा रस राहिला नाही. करडईचे क्षेत्र कापसासारख्या नगदी पिकांनी व्यापलेले दिसते आज जिल्ह्यात कापसाची 1 लाख 35हजार हेक्‍टर क्षेत्रावर लागवड झालेली दिसून येते. हे क्षेत्र पूर्वी करडईचे क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. काळाच्या ओघात शेतकऱ्यांचा कल बदलल्याने करडईचे क्षेत्र घटत गेले आजमितीला करडईच्या क्षेत्राचा विचार करता 1 टक्का देखील क्षेत्र करडईच्या वाट्याला आलेले नाही.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Leave A Reply

Your email address will not be published.