शेतकरी कर्जमाफीवरून विरोधकांच्या सलग दुसऱ्या दिवशी घोषणाबाजी 

मुंबई – विधीमंडळ अधिवेशनाच्या सलग दुसऱ्या दिवशीही काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदारांनी विधानभवनाच्या पायऱ्यांवर बसून निदर्शने केली. युती सरकारच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली. राज्यातील शेतकऱ्यांचे प्रश्न सोडविण्यात सत्ताधारी अपयशी ठरले आहेत. त्याचबरोबर शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी देण्यात आलेली नाही, या मुद्द्यांवरून विरोधकांनी सरकारविरोधात घोषणा दिल्या.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.