शिक्षण संस्था ‘ईडी’च्या रडारवर

दीड हजार संस्थांकडून मागविला शिष्यवृत्तीचा तपशील

पुणे – प्रवर्तन निर्देशनालय अर्थात ईडीने आता शिक्षणसंस्थांवर लक्ष केंद्रित केल्याचे उघड होत आहे. त्याचाच एक भाग म्हणून ईडीने पुण्यातील सुमारे दीड हजार शिक्षणसंस्थांकडून 2010 ते 2017 या कालावधीत विद्यार्थ्यांना दिलेल्या शिष्यवृत्तीचा तपशील मागविला आहे. त्यामुळे आता पुण्यातील शिक्षणसंस्थांचे धाबे दणाणले आहेत.

याबाबतचे पत्र पुण्यातील समाजकल्याण विभागाचे सहायक आयुक्‍तांनी दि. 30 ऑक्‍टोबर रोजी संबंधित शिक्षणसंस्थांना पाठविले आहे. यासंदर्भात दि. 24 ऑक्‍टोबर रोजी सिंहगड बिझनेस स्कूल, एरंडवणा येथे बैठक घेण्यात आली. त्यानंतर हे पत्र संबंधित शिक्षणसंस्थांना पाठविण्यात आले. त्यामुळे शिष्यवृत्ती वाटपात गैरव्यवहार झाला का, असा प्रश्‍न उपस्थित होत आहे.

दरम्यान, ईडीने शिष्यवृत्ती वाटपाची माहिती सादर करण्याच्या सूचना समाजकल्याण विभागास दिले आहेत. त्यानुसार समाजकल्याण विभागाने संबंधित शिक्षणसंस्थांकडून मागविली आहे. त्यात 1 ऑक्‍टोबर 2010 ते 31 डिसेंबर 2017 यादरम्यान विद्यार्थ्यांना देण्यात आलेले शिष्यवृत्ती तपशीलवार माहिती आवश्‍यक आहे. त्यात शैक्षणिक संस्थेचे नाव, अभ्यासक्रमाचे नाव, शिष्यवृत्तीसाठी वाटप झालेली रक्‍कम आणि शिष्यवृत्तीसाठी शासनाकडून आलेली रक्‍कम याचा तपशील असायला हवे. तसेच, ही माहिती सही शिक्‍क्‍यानिशी शपथपत्रासह सांक्षाकित करून सॉप्टकॉपी, हॉर्ड कॉपी
14 नोव्हेंबरपर्यंत दिलेल्या तारखेस सादर करण्यात यावी.

माहिती कार्यालयास उपलब्ध न झाल्यास भविष्यात होणाऱ्या परिणामास आपणास व्यक्‍तीश: जबाबदार ठरविण्यात येईल याची गांभीर्याने नोंद घ्यावी, असेही पत्रात नमूद केले आहे.

Leave A Reply

Your email address will not be published.