पंतप्रधानांच्या पुणे दौऱ्यावर संजय राऊत म्हणाले,…

पुणे : पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुण्यातील सीरम इन्स्टिट्यूटला भेट देणार आहेत. पुण्याचे विभागीय आयुक्त सौरभ राव यांनी पंतप्रधानांच्या दौऱ्यासाठी तयारी सुरू झाल्याचं सांगितलं आहे. मात्र आता पंतप्रधानांच्या दौऱ्यात बदल झाला असून दुपारी चार वाजता इन्स्टिट्यूटला भेट देणार आहे. यातच  पंतप्रधान मोदी यांचा पुणे दौऱ्यावर संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधान मोदी महाराष्ट्रात येत आहेत.  पुण्यात त्यांचे स्वागतच आहे. पुढे त्यांनी पत्रकारांशी बोलतांना मोदी पंतप्रधान असून त्यांचे स्वागत करणे आमचे कर्तव्य आहे.  अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली.

 

दरम्यान, यातच सकाळीच राऊत यांनी सीबीआय आणि ईडीवर एक कार्टून पोस्ट करत, खळबळ उडवून दिली होती. व्यंग ज्यांना समजले ते त्या पद्धतीने घेतील. ज्यांना नाही समजले ते आणखी सूडबुद्धीने वागतील. ज्या लोकांना विकृत आनंद घ्यायचा आहे ते घेतील. सगळे विकत घ्यायचे, गुलाम तयार करायचे ही ईस्ट इंडिया कंपनीची परंपरा होती. विरोध करणे हे विरोधी पक्षाचे काम. विधायक पद्धतीने तो व्हाय़ला हवा, अशी अपेक्षा राऊत यांनी ठाकरे सरकारच्या वर्षपूर्तीला व्यक्त केली.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.