मराठी राजभाषा दिनानिमित्त

628 विद्यार्थ्यांचा विश्‍वविक्रम

नागठाणे  – सातारा एजुकेशन सोसायटीच्या अनंत इंग्लिश स्कूलच्या 628 विद्यार्थ्यानी मराठी राजभाषा दिनानिमित्त शाळेचे मुख्याध्यापक एस. एम. शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मराठी दिनच्या आकारात बसून विश्‍वविक्रम केला.
प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या नागठाणे सेवा केंद्राच्यावतीने बी. के. सुवर्णा व डॉ. दीपक हारके यांनी आयोजित केलेल्या या उपक्रमाची नोंद ग्लोबल रेकॉर्डमध्ये झाली आहे.

बी. के. सुवर्णा यांचा हा 41 वा विश्‍वविक्रम आहे व डॉ. दीपक हारके यांचा हा 105 वा विश्‍वविक्रम आहे.
या कार्यक्रमाला अनंत इंग्लिश स्कूल, सातारा शाळेचे सर्व शिक्षक व प्रजापिता ब्रह्माकुमारी ईश्‍वरीय विश्‍वविद्यालयाच्या नागठाणे सेवा केंद्राच्यावतीने बी. के. अंकिता व बी. के. सूर्यकांत बागल व कपिल कदम यांचे सहकार्य लाभले.

Leave A Reply

Your email address will not be published.