पुणे : डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनी संविधान ग्रुपच्या वतीने डॉ. आंबेडकरांचे विचार असलेली ५ हजार पुस्तके वाटून प्रसार करण्यात आला.
बाबासाहेबांचे विचार सर्वसामान्य लोकांपर्यंत पोचावे, या संकल्पनेतून हा उपक्रम राबविण्यात आला. या वेळी ग्रुपचे राष्ट्रीय अध्यक्ष सचिन गजरमल, संस्थापक अध्यक्ष राकेश सोनवणे, महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष स्वाती गायकवाड, महाराष्ट्र उपाध्यक्ष आरती केदारी, शहराध्यक्ष गणेश लांडगे, उपाध्यक्ष राजवर्धन कांबळे, महाराष्ट्राचे संपर्कप्रमुख प्रवीण सोनवणे आदी उपस्थित होते. याप्रसंगी डॉ. आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
आरपीआय आठवले गटातर्फे अभिवादन सभा
महापरिनिर्वाण दिनानिमित्त राजमाता रमाबाई आंबेडकर चौक, सिद्धार्थनगर, बावधन येथे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले ), विकास प्रतिष्ठान, सुजाता महिला मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने महापरिनिर्वाण अभिवादन सभेच्या आयोजन करण्यात आले होते. या वेळी डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करण्यात आले.
या वेळी बुद्ध वंदना घेऊन अभिवादन सभेची सुरुवात करण्यात आली. बावधन पोलीस चौकीचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक अनिल विभूते यांनी मनोगत व्यक्त केले. माजी नगरसेवक दिलीप वेडे पाटील, माजी सरपंच वैशाली कांबळे, कार्यक्रमाचे मुख्य आयोजक उमेश कांबळे यांनी मनोगत व्यक्त केले.
याप्रसंगी माजी उपसरपंच तानाजी दगडे, ग्रामपंचायत सदस्य सूर्यकांत भुंडे, युवा नेते अभिजीत दगडे, रेखा सरोदे, आशा भालेराव, विजया कांबळे, ज्ञानेश्वर साळवे, अजय पाचपुजे, अंकुश तिडके, संजय कांबळे, अविनाश कांबळे, राहुल कांबळे, संदीप कांबळे, आनंद कांबळे, यशराज कांबळे, रोशन खाडे, संतोष सहजराव आदी उपस्थित होते. सूत्रसंचालन दिनकर चंदनशिवे यांनी केले.
रिपब्लिकन चर्मकार महासंघ
डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना रिपब्लिकन चर्मकार महासंघाचे संस्थापक अध्यक्ष संजूभाऊ बनसोड यांच्या हस्ते पुणे स्थानक येथील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महासंघाचे अध्यक्ष रोहिदास थोरात, जिल्हा अध्यक्ष गजानन अवसरे, अशोक ठवाळ, सुनील गायकवाड, बंडू पुरुषोत्तम, रवींद्र शिराळे, शामलाल पठ्ठे आदी उपस्थित होते.
झोपडपट्टी सुरक्षा दल
झोपडपट्टी सुरक्षा दलातर्फे डॉ. आंबेडकरांना अभिवादन करण्यात आले. दलाचे संस्थापक अध्यक्ष भगवान वैराट यांच्या हस्ते जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी दलाचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष मोहम्मद शेख, राज्य संघटक सुरेखा भालेराव, सतीश कांबळे , वंदना पवार, आबासाहेब चव्हाण, संतोष कदम आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष
राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षातर्फे डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला शहर उपाध्यक्ष आनंद सवाणे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. या वेळी मिलिंद सवाणे, सिद्धार्थ सवाणे, अर्णव सवाणे आदी उपस्थित होते.
चौरे समाजसेवा प्रतिष्ठान
विलास चौरे समाजसेवा प्रतिष्ठानच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष बाळासाहेब चौरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी महापालिकेतील समाज विकास विभागाच्या समूह संघटिका सविता वाडेकर, समीना पठाण आदी उपस्थित होते.
महिला काँग्रेस पक्ष
महाराष्ट्र प्रदेश महिला काँग्रेस आणि पुणे शहर महिला काँग्रेसच्या वतीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन करण्यात आले. महिला कॉंग्रेसच्या प्रभारी अध्यक्षा आणि महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्षा संगीता तिवारी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी शोभना पण्णीकर, सोनिया ओव्हाळ, रमा भोसले, कांता ढोणे, पपिता सोनावणे आदी उपस्थित होते.
राष्ट्रवादी काँग्रेस (शप) महिला
पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महिला आघाडीतर्फे डॉ. बाबासाहेबांना अभिवादन करण्यात आले. शहर महिला अध्यक्ष मृणालिनी वाणी यांच्या हस्ते डॉ. आंबेडकरांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करण्यात आला. या वेळी फिरोजा शेख, सारिका सोनवणे, राधिका नवले आदी उपस्थित होते.
प्रियदर्शनी शिक्षण संस्था
प्रियदर्शनी शिक्षण संस्थेतर्फे अध्यक्षा शशिकला कुंभार यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. या वेळी महेश कुंभार, वर्षाराणी कुंभार आणि शाळेच्या मुख्याध्यापिका, शिक्षक आदी उपस्थित होते.