गोकुळाष्टमी निमित्त श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात नयनरम्य अशी फळाफुलांची सजावट; पहा फोटो….

पंढरपूर  – श्रीकृष्ण गोकुळाष्टमी आणि चौथा श्रावणी सोमवार निमित्ताने पंढरपुरातील श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिराच्या गाभाऱ्याला आकर्षक फळाफुलांनी सजवण्यात आलं आहे.

यावेळी वेगवेगळी पाचशे किलो फळे आणि दोन हजार किलो आकर्षक फुलांनि देवाचा गाभारा सजवण्यात आला आहे.

सध्या पवित्र असा श्रावण महिना सुरु झाला आहे. हा महिना भगवान शंकराच्या उपासनेसाठी अतिशय महत्व पूर्ण आहे.

आज चौथा श्रावणी सोमवार आणि गोकुळाष्टमी असल्याने राज्यातील प्रमुख तीर्थक्षेत्रांपैकी असणाऱ्या पंढरपूर येथील सावळया विठुरायाच्या आणि रुक्मिणी मातेच्या मंदिराला आकर्षक व नयनरम्य अशी ही सजावट करण्यात आली. 

डिजिटल प्रभातचे टेलिग्राम जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

You might also like

Comments are closed.