सोलापूर – भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या १३१ व्या जयंतीनिमित्त सोलापूरकरांना आज (दि. १४) दिवसभर एका रुपयात एक लीटर दराने पेट्रोल या योजनेचा लाभ घेता येणार आहे. पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती १५ दिवसांत तब्बल १३ वेळा वाढल्या असून, सामान्य जनतेच्या खिशाला मोठी कात्री बसत आहे. राज्यात आज मोठ्या प्रमाणात पेट्रोल वाढ झाली आहे.
आणि अश्यातच आज (दि. १४) सोलापूरमधील नागरिकांना पेट्रोल एक रुपये लीटरने दिलं जाणार आहे. जवळपास ५०० लिटरपर्यंत पेट्रोल या योजनेअंतर्गत देण्यात येणार आहे. ही ऑफर आजच्या दिवस असणार असून, सोलापूरकरांनी पेट्रोल पंपावर चांगलीच गर्दी केली असल्याचे दिसून येत आहे.
मिळालेल्या माहितीनुसार ‘राहुल सर्वगोड’ यांनी या योजनेचे आयोजन केलं आहे. ‘मोदी सरकारचा निषेध आणि बाबासाहेब जंयतीनिमित्त आम्ही हा छोटासा उपक्रम राबवत आहोत.’ असं देखील राहुल सर्वगोड म्हणाले आहेत.