राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींचा विशेष संदेश  

मेजर ध्यानचंद यांनी भारताला ऑलंपिकमध्ये हॉकी खेळात  ३ सुवर्ण पदके जिंकून देण्यात मोठा वाटा उचलला होता. हॉकीमधील सर्वकालीन महान खेळाडू मेजर ध्यानचंद यांची आज ११३ जयंती आहे. त्यांच्या स्मरणात २९ ऑगस्ट हा दिवस भारतामध्ये ‘राष्ट्रीय क्रीडा दिन’ म्हणून साजरा केला जातो.  भारताचे पंतप्रधान  नरेंद्र मोदी यांनी ट्विट करत भारतीयांना शुभेच्छा आणि संदेश दिला.

आपल्या ट्विटमध्ये नरेंद्र मोदी यांनी लिहले आहे की,  “आज मी सर्व क्रीडाप्रेमींना राष्ट्रीय क्रीडा दिनासाठी शुभेच्छा देतो.असामान्य हॉकी खेळाडू मेजर ध्यानचंद यांना मी वंदन करतो. मी सर्व लोकांना खेळाकडे  लक्ष केंद्रीत करण्याससाठी प्रेरित करतो जेणेकरून आपण एक आरोग्यदायी भारत घडवण्याकडे वाटचाल करू.”

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

मेजर ध्यानचंद यांनी १९२८, १९३२ आणि १९३६ या सलग तीन ऑलंपिक स्पर्धात हॉकीमध्ये भारतीय संघाचे प्रतिनिधित्व केले आणि त्यात विजय मिळवून दिला. विशेषत: बर्लिन ऑलंपिक १९३६ मध्ये भारतीय संघाने जर्मनीचा हुकूमशहा अडॉल्फ हिटलरच्या उपस्थितीत जर्मन संघाला अंतिमफेरीत ८-१ अशी धूळ चार्ली होती. या विजयासह सलग तीन ऑलंपिक स्पर्धात सुवर्णपदक जिंकून अनोखी किमया साधली होती.

 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)