अमृता फडणविसांच्या नव्या गाण्यावर रोहित पवार म्हणाले,’काही लोकांना सहज, तर…’

मुंबई – माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी बँकर असल्या तरी त्या गायिका म्हणून आता संपूर्ण महाराष्ट्राला परिचीत आहेत. राजकीय विषयांवर टीप्पणी कऱणाऱ्या अमृता फडणवीस सोशल मीडियावर गायणामुळे सतत चर्चेत असतात. त्यांनी जागतिक महिला दिनानिमित्त आज आपलं नव गाणं सादर केलं आहे.  त्यांच्या या गाण्यावर राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार रोहित पवार यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

रोहित पवार यांनी ट्विट केले आहे की,’काही लोकांना सहज तर काहींना प्रयत्न करूनही संधी मिळत नाही. ज्यांना सहज संधी मिळते ते या संधीचा योग्य वापर करतातच असं नाही, पण @fadnavis_amruta  ताई मिळालेल्या संधीचा आपण गाण्याची आवड जोपासण्याचा जो प्रयत्न करता त्याचा आदर वाटतो. अशीच आवड जोपासा. आपल्याला मनापासून शुभेच्छा!’ असं म्हणत त्यांनी शुभेच्छा दिल्या आहे.

दरम्यान, अमृता यांच्या गाण्याची निर्मिती टी-सिरीजने केली आहे. हे गाणं नाट्य संगीतावर आधारित आहे. भावनांच्या या जगतात गडबडले मी गडगडले, असा उल्लेख या गाण्यात आहे. ट्विटरवर केलेल्या पोस्टमध्ये अमृता यांनी या गाण्याला प्रेरणादायी गीत म्हटलं आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.