मुंडे प्रकरणावर रोहित पवार म्हणाले,”जर ते खोटे असते तर…”

मुंबई : धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. या संपूर्ण प्रकरणाची पोलीस चौकशी सुरु आहे. त्यामुळे या प्रकरणावर आता काही भाष्य करणे योग्य ठरणार नाही. परंतु तरीदेखील हे प्रकरण बदनामी आणि ब्लॅकमेलिंग संबंधी असल्याची माहिती समोर येत आहे.मात्र या प्रकरणी धनंजय मुंडे यांनी अगोदरपासूनच सर्व सत्य परिस्थिती सोशल मीडियाच्या माध्यमातून समाजासमोर ठेवली आहे. जर हा माणूस खोटा असता तर व्यक्त झाला नसता असे म्हणत एकप्रकारे धनंजय मुंडे यांचे समर्थन देखील रोहित पवार यांनी यावेळी केले आहे.

‘त्याच्या’ डोक्यावर परिणाम झालाय -अजित पवार

“आता तुम्हीच ठरवा”म्हणत रेणू शर्माने घेतली माघार ?

धनंजय मुंडेंच्या अडचणी वाढणार; आरोप गंभीर, म्हणून…

या प्रकणात पोलिसांची चौकशी सुरु असून सध्या बोलणे योग्य नाही तरी  पण आता पर्यंतचा समोर आलेल्या माहितीनुसार हे प्रकरण पूर्णतः  बदनामी आणि ब्लॅकमेलिंग संबंधी असल्याचे समोर येत आहे. तसेच  धनंजय मुंडे यांच्यावर झालेले आरोप हे वैयक्तिक व कौटुंबिक पातळीवरचे आहे. आणि त्यांनी याबाबत सुरुवाती पासूनच सोशलवर आपली बाजू मांडली  आहे. जर ते खोटे असते तर  व्यक्त झाले नसते” अस म्हणत पवार यांनी  पत्रकारांशी बोलतांना भुमिका मांडली आहे.

डिजिटल प्रभात आता टेलिग्रामवर! चॅनल जॉईन करा व मिळवा सर्व महत्वपूर्ण अपडेट्स, चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा

Leave A Reply

Your email address will not be published.