मुंबई – दिवंगत अभिनेता सुशांतसिंह राजपूत मृत्यू प्रकरणानंतर नारकोटिक्स कंट्रोल ब्युरो (एनसीबी) ड्रग्स प्रकरणात तपासाची व्याप्ती वाढवत आहे. यामध्ये आता राष्ट्रवादी नेते नवाब मालिक यांच्या जावयाचे नाव समोर येत आहे.
बॉलिवूड अभिनेता अर्जुन रामपालनंतर या प्रकरणात आता एनसीबीने अभिनेत्री दिया मिर्झाच्या माजी व्यवस्थापकासह तिघांना अटक केली आहे. दियाचा माजी व्यवस्थापक रहिला फर्नीचरवालासह त्याची बहिण आणि ब्रिटीश व्यावसायिक करण सजदानीलाही एनसीबीने ताब्यात घेतले आहे. या कारवाईत एनसीबीने 200 किलोग्रॅम गांजाही जप्त केला आहे. या तिघांच्या चौकशीत नवाब मलिक यांच्या जावई समीर खान समोर आले आहे. या प्रकरणाबाबत पहिल्यांदाच नवाब मलिक यांनी ट्विटवर आपलं मत मांडले आहे.
Nobody is above the law and it should be applied without any discrimination.
Law will take its due course and justice will prevail.
I respect and have immense faith in our judiciary.— Nawab Malik نواب ملک नवाब मलिक (@nawabmalikncp) January 14, 2021
यातच नवाब मलिक यांनी ट्विट केले आहे की,’ कोणीच कायद्यापेक्षा कोणीही मोठा नाही. या प्रकरणात कोणताही भेदभाव न करता कारवाई व्हायला हवी. कायदा त्याचे काम करेल. मला पूर्णपणे न्यायसंस्थेवर विश्वास आहे. ‘
दरम्यान,नवाब मलिक यांची मुलगी निलोफर हिचे लग्न समीर खान यांच्याशी झाले होते. समीर खान आणि करन सजदानी यांच्यामध्ये २ हजार रुपयांचा व्यवहार झाल्याची माहिती एनसीबीने दिली आहे.
एनसीबीने म्हंटले कि, समीर खान आणि करन सजदानी यांच्यामधील २ हजार रुपयांचा व्यवहार ड्रग्जप्रकरणी झाला असल्याचा आम्हाला संशय आहे. याची पडताळणी करण्यासाठी समीर खान यांना चौकशीसाठी बोलविण्यात आले आहे.